किणी ग्रामपंचायतीकडून मनमानी कारभार
किणी ग्रामपंचायतीकडून मनमानी कारभार
किणी/प्रतिनिधी-
किणी (ता.चंदगड) येथे कोणालाही विश्वासात न घेता बेकायदेशीर काम करण्यात येत आहे. अशा पध्दीच्या बेकायदेशीर कामांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोणालाही विश्वासात न घेता बेकायदेशीर कामे चालू आहेत. आर.सी.सी. रस्ता केलेला असून त्या कामासंदर्भात कोणतीही जाहीरात किंवा निविदा न मागविता कामकाज केले आहे. मनमानी कारभार करून शासकीय नियमानुसार निविदा न मागविता एखाद्या व्यक्तीला काम देणे किंवा मर्जीतील व्यक्तींना टेंडर देणे हे बेकायदेशीर आहे. अशा पध्दतीने किणी ग्रामपंचायत काम करित असून नंतर तांत्रिक व कागदोपत्री पुर्तता करायची असे उलट कामाची पध्दत ग्रामपंचायतीने अवलंबली आहे. तसेच मागासवर्गीय वस्तीत काम करताना कोणत्याही मागासवर्गीय सदस्यांला न विचारता घेता निकृष्ठ दर्जाचे आरसीसी गटर्स बसविणेत आली आहेत. अशा सर्व कामांची चौकशी करून योग्य कारवाई प्रशासनाने करावी असे निवेदन चंदगडचे गटविकास अधिकारी यांना सामजिक कार्यकर्ते प्रविण गणाचारी यांनी दिले आहे.
सदर निवेदन दिल्यानंतर ग्रामपंचायतीने दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी निविदा वृत्तपत्रामधून प्रकाशित केल्या आहेत. याचा अर्थ काम आधी नंतर निविदा हा उलटा कारभार ग्रामपंचायतीचा सुरू आहे.
0 Comments