रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मा सीमाताई साहेब आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथे कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप - सतीश माळगे

कोल्हापूर (वसगडे) / प्रतिनिधी :

गेल्या दोन वर्षापासून कोरोना ने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे त्यातच २०१९ चा महापूर व पुन्हा २०२१ च्या महापुराने कोल्हापुरातील जनतेचे हाल झाले आहे यात आंबेडकरी चळवळीचे गाण्यातून प्रबोधन करणारे तसेच कलापथक, ऑर्केस्ट्रा, हलगीवादक या कलाकारांच्या वरती गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे तरीही राज्य शासनाने कोणत्याही पद्धतीची मदत या कलाकाराना केलेली नाही. 

*कोरोनामुळे सर्व कार्यक्रम ठप्प आहेत त्यामुळे अतोनात हाल या कलाकारांचे होत आहे राज्य शासन या कलाकारांच्या कडे लक्ष देणार आहे की नाही असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हा नेते सतीश (दादा) माळगे यांनी केला आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. मा. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने तसेच रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मा. सीमाताईसाहेब आठवले यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले होते पूरग्रस्त तसेच कोरोणामुळे हाल झालेल्या गरजूंना मदतीचे आवाहन केले होते त्याचे पालन करत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मा: सीमाताईसाहेब आठवले यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून  कळंबा येथील साळुंखे हॉल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे गाण्यातून प्रबोधन करणाऱ्या तसेच ऑर्केस्ट्रा, कलापथक ढोलकीवादक,हलगीवादक असे कलेवरती ज्यांचा उदरनिर्वाह आहे अशा कलाकारांना कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी निर्माता संघाचे अध्यक्ष आयु. मुकुंद सुतार, निर्माता संघाचे सचिव आयु. प्रसाद कुलकर्णी, निर्माता संघाचे सदस्य आयु. गणेश कशिष भोसले,महाराष्ट्र कलाकार संघटनेचे उपाध्यक्ष आयु. प्रदीप कोळी तसेच रिपब्लिकन पक्षाचे प्रदीप ढाले, महादेव सोरटे, प्रवीण निगवेकर, प्रवीण आजरेकर, सलमान मौलवी, संदीप तांमगावकर,  संबोधी कांबळे तसेच रमेश सातार्डे, प्रदीप कोळी ,देवदास घारे ,कृष्णा वाघमारे, अमोल चव्हाण ,संतोष मेढतली,दीपक तोरसे, प्रताप देसाई, सारिका डावाळे, चिमु डावाळे, लक्ष्मी कोळी, अलका पाटील, सविता लाखे, शारदा काटवे, भार्गव कांबळे, सुधीर सुतार, उमेश धनवडे, निखिल कुडित्रेकर, अजय डावाळे, आशिष मोहिते, अनिल जाधव, कोमल रणदिवे, माया कुलकर्णी, पूजा कांबळे, शहाजमान पठाण यांच्यासह कलाकार तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.