युवा वर्ग कवितेतून विवेक जागवत आहे- प्रा. डॉ. सतिश मस्के
युवा वर्ग कवितेतून विवेक जागवत आहे- प्रा. डॉ. सतिश मस्के
धम्मनिनाद काव्य महोत्सव डॉ. गेल ओमवेट यांच्या धम्मकार्याला आणि स्मृतींना समर्पित
कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळ्याच्या निमित्ताने युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आयोजित "धम्मनिनाद काव्य महोत्सव" काल पार पडला. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कवियत्री माधुरी वसंत शोभा आणि संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. सतिश मस्के सर होते. सतिश भारतवासी यांनी दोघांचा विस्तृत परिचय करून दिला. स्वागत, प्रास्ताविक डॉ. संतोष भोसले यांनी करताना वारंवार काव्य महोत्सव घेण्याचा उद्देश सांगितला. मंदा सोनताटे यांनी त्रीसरण आणि पंचशील घेतले. स्वागताध्यक्ष माधुरी वसंत शोभा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सिनेकलाकार, निवेदक, धम्म अभ्यासक आणि Voice Culturist निलेश पवार सरांची महोत्सवात अचानक उपस्थिती हे महोत्सवाचे आकर्षण ठरले. सरांनी एक जबरदस्त दिर्घ कविता सादर केली. चिमुकल्या प्रज्वलने "मी सुखाचा मार्ग माझा शोधतांना, भेटली मज तत्व सारी गौतमाची..." ही रवी कांबळे यांची अप्रतिम गझल सादर केली, गायक विकास यांनीही बहारदार गीत गायन केले. या महोत्सवात आम्रपाली पारवे, अनिल केंगार, परशराम कांबळे (विद्रोही PK), संजय धांडे, रवी माळापुडेकर, गंगाभाऊ काकडे, प्रा. सचिन कांबळे, संगीता रामटेके, मंदा सोनताटे, सुरेश वडर, भीमराव तांबे, रमेश कांबळे यांनी अप्रतिम कविता सादर केल्या. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. सतिश मस्के सरांनी सर्व काव्य रचना आणि सादरीकरणाचे कौतुक केले, आपल्या काव्यरचना सादर केल्या, मार्गदर्शन केले. प्रा. सचिन कांबळे सरांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचलन केले. अनिता गवळी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले, ज्योती डोंगरे मॅडम यांनी धम्म पालन गाथा घेतली. एकूण कार्यक्रमास उत्सवाचे स्वरूप होते. सर्वांचं अभिनंदन आणि मनपूर्वक आभार...!
0 Comments