जेव्हा शिक्षकच बनतो भक्षक : विद्यार्थिनीची छेड, मानसिक त्रास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील घटना
जेव्हा शिक्षकच बनतो भक्षक : विद्यार्थिनीची छेड, मानसिक त्रास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील घटना
ऑल इंडिया पँथर सेना औरंगाबाद यांचा निषेध
औरंगाबाद दि.०९: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी एका विद्यार्थिनीला छेड कडून मानसिक त्रास देऊन तीचे खच्चीकरण केले ही निंदनीय घटना या विद्यापीठात घडली यांनी समस्त विद्यापीठाची बदनामी झाली आहे. घडलेल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या विद्यापीठाचे प्रमुख म्हणून आपण गुन्हा दाखल करावा आणि त्या नराधमाला या परिसरात पायबंध करून त्याचे निलंबन करावे.
याने विद्यापीठाचे बदनामी होईल असे कृत्य या आधीही अनेकदा केले आहेत. एखादा शिक्षकच जर भक्षक बनव असेल तर पालकांनी मुला-मुलींना कोणाच्या भरोशावर शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे पाठवायचे हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतो.
याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उद्रेकी आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन डॉ प्रमोद येवले यांना देण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे, विद्यार्थी आघाडीचे प्रथम कांबळे , मराठवाडा अध्यक्ष बाबा तिवारी, जिल्हा महासचिव शुभम मगरे, जिल्हा सचिव अमोल शेजवळ, विकास शेजवळ , जिल्हा संघटक ग्रा.अमर लोखंडे, जिल्हा संघटक अध्यक्ष कपिल गायकवाड, शहर अध्यक्ष आदित्य रगडे , कमलेश दाभाडे आदी पद अधिकारी उपस्थित होते.


0 Comments