विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशासाठी कोविड -19 लसीचे दोन डोस सक्तीचे करणे गरजेचे नाही

नांदेड दि. 18 :  महाविद्यालयातील पदवी /पदव्युत्तर वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या दि.13/10/2021च्या शासन निर्णयानुसार महाविद्यालयात नियमित वर्ग दि. 20/10/2021 पासून सुरु होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यानी कोविड -19च्या लसीचे दोन डोस घेतले आहेत तेच विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहू शकतात.महाराष्ट्र शासनाच्या आदेश निर्णयानुसार महाविद्यालयात कोविड -19 लसीचे दोन डोस घेतली असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला गेला आहे,केंद्र सरकारने व आरोग्य विभागाने अश्या पद्धतीचा कोणताही आदेश काढलेला नाही, सर्वोच्च न्यायालय व काही राज्यातील उच्च न्यायालय यांनी कोविड 19लसीची सक्ती केलेली नाही व लसीची सक्ती करण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही, तरीपण महाराष्ट्र सरकारने कुलगुरू, प्राचार्य, यांनी कोविड -19 लसीची सक्ती करण्याचा आदेश दिलेला आहे.

लसीकरणाला विरोध नाही पण सक्तीची करणे याला पूर्णतः विरोध आहे, आरोग्य विभागाने विद्यापीठ, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयाना दोन महिने अगोदर अध्यादेश काढायला हवा होता जेणेकरून विद्यार्थ्यांनी लसीकरण केले असते, पाहिली डोस आणि दुसरी डोस यात दोन महिन्याचा कालावधी असल्याकारणाने विद्यार्थी दोन डोस घेतलेले नाही,विद्यार्थ्यांना सक्तीचे करून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करू नये.

तरी महाराष्ट्र सरकारने काढलेला लसीची सक्ती आदेश रद्द करण्यात यावा,अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश नाही दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल असावी.याबाबत ऑल इंडिया पँथर सेना नांदेड च्या वतीने मा. मुख्यमंत्री साहेब (म. रा.) यांना मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी मा. भीमरावजी बुक्तरे (जिल्हाध्यक्ष, नांदेड ), सुरेश सावते, पत्रकार गणेश ढोले, आनंदा पाटील सुनील पाटील, केशवजी जाधव, पत्रकार संजयजी राक्षसे, अनिकेत पोहरे इ. उपस्थित होते.