पिडीत महिला मंगल कांबळे यांचा पुन्हा आंदोलनाचा एल्गार, में. कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून देखील आरोपींना अजून अटक नाही
पिडीत महिला मंगल कांबळे यांचा पुन्हा आंदोलनाचा एल्गार, में. कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून देखील आरोपींना अजून अटक नाही
- आगळगाव अँट्रोसिटी केस मधील आरोपी विजय माळी यांना अटक करा, कर्त्यव्यात कसूर कामी डीवायएसपी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शाहणे यांच्यावर गुन्हा दाखल करा
- मुख्यमंत्री साहेब जरा इकडे लक्ष द्या , सामाजिक न्याय की अन्याय ?
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी दि. ०१ : फिर्यादी मंगल नामदेव कांबळे मु.पो आगळगाव, तालुका कवठेमहांकाळ येथील रहिवासी असून त्या अनुसूचित जाती या समाजातील आहे. त्यांचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने उद्वस्त केल्या प्रकरणी व धमकावल्या प्रकरणी त्यांनी आरोपी विजय तुकाराम माळी, शोभा विजय माळी सह इतर ४ ते ५ अनोळखी लोकांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचारास प्रतिबंध सुधारणा) अधिनियम २०१५ नुसार दि.३१ ऑगस्ट २०२१ रोजी FIR No. 322/2021 नुसार भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१, ४४७, ४४८, ४६१, ४२७, १४३, १४९, ५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या कलम ३(१),(f),(g),(r),(s),(z), (va) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे वरील नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. तथापि गुन्हा दाखल होऊनही एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केले नाही.
फौजदारी जामीन अर्ज नं. १०३९/२०२१ निशाणी क्रमांक १ च्या अर्जावरील दि.२०.०९.२०२१ रोजी सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री.व्य.पोतदार यांनी लेखी आदेश पारित करून आरोपी विजय तुकाराम माळी यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यासोबत में. सत्र न्यायालय यांनी दि.३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आरोपी विजय माळी यास उच्च न्यायलयात मुंबई येथे अपील करण्याची दिलेली मुदत देखील संपलेली आहे. असे असताना आरोपीला पाठीशी घालण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी जत, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करत आहे. मुळातच में.कोर्टाने आरोपी यास अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावून सांगली जिल्हा न सोडण्याबाबत तसेच कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे हजेरी लावण्यास व तपास कामी सहकार्य करण्यास सांगितले आहे, याबाबत आरोपीने तसे हमीपत्र में.कोर्टात सादर केले आहे, असे असताना आरोपी विजय माळी आम्हाला सापडत नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शाहणे हे आम्हास वेळोवेळी सांगत आलेले आहेत. आरोपींना उघडपणे संबंधित अधिकारी पाठीशी घालत आहेत. अशी माहिती पिडीत महिला मंगल कांबळे यांनी दिली
मागण्या :
१) आरोपी विजय माळी यास तात्काळ अटक करावे
२) सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून आम्हाला आर्थिक मदत तसेच पुनर्वसन करण्यात यावे.
३) कर्त्यव्यात कसूर कामी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शाहणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सह आरोपी करावे.
४) तलाठी, सर्कल, तहसिलदार यांच्याकडे बनवाट कागदपत्रे बोगस नोंदी प्रकरणी चौकशी करण्यात यावी.
५) मला व माझ्या कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे,
६) ज्या जेसीबीच्या सहय्याने घर पाडले ते अजूनही जप्त नाही. सी.आर.पी.सी १६४ नुसार जबाब नोंद केले नाही, पंचनामा , तपास याचे विडीओ रेकोर्डिंग केले नाही. पंचनामा मधील पंच आमच्या ओळखीचे नाहीत.
वरील मागण्याबाबत पिडीत महिला सहकुटुंब सोमवार दि. ०४.१०.२०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत आंदोलन छेडत आहे अशी माहिती वर्षा कांबळे यांनी दिली.
0 Comments