अखेर अँट्रॉसीटी केसमधील फरारी आरोपी विजय माळीला अटक
अखेर अँट्रॉसीटी केसमधील फरारी आरोपी विजय माळीला अटक
पिडीत कुटुंबाचे गेले १२ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन सुरु
सांगली दि.१६:आगळगाव तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथील पिडीत महिला मंगल कांबळे हिचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने उद्वस्त केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे दि.३१ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी विजय माळी, शोभा माळी यांच्यासह ४ ते ५ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केलेला होता. आरोपी विजय माळी याचा अटकपूर्व जामीन अर्ज सांगली येथील सत्र न्यायालय यांनी दि.२० सप्टेंबर रोजी फेटाळला. तेव्हापासून आरोपी फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. याबाबत पिडीत महिला व त्यांचे कुटुंब ०४ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत आंदोलनास बसलेले आहेत.
अखेर दि. १० ऑक्टोबर रोजी कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपी विजय माळी याला अटक केले. आरोपी विजय माळी याला दोन दिवसाची पोलिस कोठडी यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले करत आहेत. पीडितांचे पुर्नवसन व्हावे, तपास सखोल करावा, बोगस नोंदी व कर्त्यव्यात कसूर कामी संबधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा आदी मागण्याबाबत पिडीत महिलेचे गेले १२ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. अजूनही सामाजिक न्याय विभागाने आर्थिक मदत कायद्यानुसार केलेली नाही, अशी माहिती मंगल नामदेव कांबळे, वर्षा कांबळे यांनी दिली.
0 Comments