महाराष्ट्र राज्य शासनाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम
महाराष्ट्र राज्य शासनाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम...!
- सुरेश सावते (युवा जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना, नांदेड)
महाविद्यालयातील पदवी /पदव्युत्तर वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या दि.13/10/2021च्या शासन निर्णयानुसार महाविद्यालयात नियमित वर्ग दि.20/10/2021 पासून सुरु होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यानी कोविड -19च्या लसीचे दोन डोस घेतले आहेत तेच विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहू शकतात.
अश्या पद्धतीने जर राज्य सरकार विद्यार्थ्यांना नियम अटी लावत असेल तर महाराष्ट्रात सत्ताधारी लोकांच्या मोठमोठ्या सभा, आंदोलने, मोर्चे लाखो जनसमुदायात पार पडत आहेत, तिथे सर्वच लोक कोव्हीड -19चे दोन डोस घेऊन जातात, किंवा तेथे तपासणी होती का मास्क चा वापर होतोय, याठिकाणी महाराष्ट्र सरकार कडक निर्बंध का घालत नाही किंवा त्यांच्यावर गुन्हे का दाखल करत नाही काय तिथे कोरोना होत नाही का त्यांचे कोरोनाला परवानगी घ्यावी लागते का, आणि महाविद्यालयात कोरोना कसा उफाळून येतोय की विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करावे लागते.
कोविड -19 लसीचे दोन डोस घेतले असतील तरच महाविद्यालयात प्रवेश अन्यथा शिक्षणापासून वंचित राहा, महाराष्ट्र सरकार कुठे आहे तुमची मानसिकता, कुणाचा अजेंडा राबवता, हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न चालू आहे, विद्यार्थ्यांवर अश्या प्रकारचे निर्बंध घालणे म्हणजे हुकूमशाही झाली, भारतात लोकशाही आहे संविधानाने सर्वांना हक्क दिलाय, आमचा विरोध लस घेण्यासाठी नाही पण सक्तीची करणे याला टिकाव नाही सरळ सरळ हुकूमशाही झाली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कोव्हीड -19 लसीची सक्ती प्रवेशासाठी न करण्यात यावी याबाबत मा. उदय सामंत (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री) यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले.
0 Comments