युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाची दखल 

आंदोलनकर्त्यांच्या जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले 

उपजिल्हाधिकरी तथा  तहसीलदार भातकूली यांनी आंदोलकांची दखल घेत लेखी स्वरूपात पुनर्वसनाची मागणी पूर्ण केली.  तात्काळ 300 पूरग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम सुरू करू असे लेखी पत्र दिले

अमरावती / जिल्हा प्रतिनिधी (सतीश वानखडे) : बुधवार दिनांक 29-09-2021 रोजी भातकुली तालुक्यातील गणोजा (देवी) अंतर्गत वार्ड क्रमांक 3. वनोजा येथील तीनशे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणी साठी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते.

गणोजा (देवी) वार्ड क्र.3 नदीपलीकडे तीनशे लोकांची  लोकवस्ती असून येथील लोकांना शासनाच्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसून  कुठलीच सुख-सुविधा उपलब्ध नाही. 

पावसाळ्यात चार महिने नदीच्या पुरामुळे मुलांचे शिक्षण पूर्णपणे बंद होते. रोगराईमुळे या ठिकाणी लोक उपचाराविना दगावत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. आठ दिवसा अगोदर दोन गरोदर महिलांना नदीच्या पुरामुळे गावा बाहेर रुग्णालयापर्यंत जाऊ न शकल्या मुळे  पोटातील बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सततच्या पावसामुळे तेथील नागरिक  विवंचनेत असून हे गाव भारताच्या सिमेत येत नाही का तसेच शासनाने आम्हाला फक्त मरण्यासाठी सोडून दिलं आहे का प्रश्न तेथील नागरिक विचारीत आहे.  यासाठी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आज दिनांक 29/09/2021 रोजी हजारोच्या संख्येने आंदोलनकर्ते जलसमाधी घेण्यासाठी पेढी नदीच्या दिशेने  निघाले असता सर्व आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी नदी पात्रात जाण्यापासून रोखल्या कारणाने   भातकुली दर्यापूर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले. युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या हजारो आंदोलन कर्त्यांनी प्रशासन व सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.

भातकुली पेढी नदी जवळ एनडी, आर, एफ,चे बचाव पथक तैनात करण्यात आले होते. अश्यावेळी डी.सी.पी, आर.डी.सी व भातकुली तहसीलदार यांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांची पुनर्वसनाची मागणी पूर्ण केली. तसेच  लेखी स्वरूपात लवकरच पुनर्वसनाचे काम सुरू करू असे आश्वासन दिले.

यावेळी जलसमाधी आंदोलनाला युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान योगेश भाऊ गुडधे, युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव मा. नितीन भाऊ मोहिते, युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रवक्ते प्रशांत भाऊ मेश्राम,जिल्हाप्रमुख अमित भाऊ निकाळजे, अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भाऊ शिंनगारे, अमरावती जिल्हा संघटक प्रमुख अंकुश भाऊ सोलव, युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख मा. विकी भाऊ ढोके, मा. योगेश भाऊ साबळे समाजसेवक, मा. गजानन वानखेडे सर, मा. गोलू भाऊ गजभिये, युवा लॉयन्स ग्रुप महीला विंग अमरावती जिल्हा प्रमुख मा. बरखा ताई बोज्जे, युवा लॉयन्स ग्रुप महिला विंग अमरावती महासचिव मा.अपर्णाताई सवई, सौ. मा. वर्षा ताई देशमुख, मा. सुमित भाऊ कूमारे, मा. नईम भाई पठाण, मा.प्रतीक भाऊ हिवराळे, मा.पंकज भाऊ सोनोने, मा.संदेश भाऊ मेश्राम, मा.आयुष भाऊ धरगावे, मा.अक्षय भाऊ गोळे, मा. प्रज्वल भाऊ गजभिये, मा.योगेश भाऊ साबळे, मा.दिनेश भाऊ आडे, मा. शारदा बोरकर, अब्दुल वारीस, मुक्तार खान, मोहम्मद इरशाद,  रेहान खान उपस्थित होते.