शिवाजी विद्यापीठाची एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी : अमोल वेटम
शिवाजी विद्यापीठाची एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी : अमोल वेटम
सांगली दि.०८ : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता शिवाजी विद्यापीठ मधील एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा दि. २०,२१,२२ रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठाने ठरवलेले आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने न घेता ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांना केली आहे.
महाविद्यालयांकरिता अजून पर्यंत ऑफलाईन परीक्षा घ्यावी याबाबत स्पष्ट आदेश शासनाकडून मिळालेले नाहीत. ऑफलाईन परीक्षा घेऊन कोविड १९ चा प्रादुर्भाव होणार नाही याची कोणती खबरदारी विद्यापीठ घेणार आहेत म्हणजे जे विद्यार्थी परीक्षेकरिता बसणार आहे त्यांचे लसीकरण झाले किवा कसे ? याबाबत सुस्पष्टता नाही. परीक्षार्थीच्या आरटी पीसीआर टेस्ट घेणार आहेत का ? जर एखादा विद्यार्थी कोरोना लक्षणात्मक असेल तर तो विद्यार्थी परीक्षापासून वंचित राहू शकतो, अशा विद्यार्थ्यासाठी पुन्हा परीक्षा विद्यापीठ घेणार का ? याबाबत स्पष्ट धोरण नाही. सध्या विद्यापीठ अंतर्गत पदवी अभ्यासक्रम करिता जशी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे त्याच धरती वर एमफिल, पीएचडी परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घ्यावी जेणेकरून तिसरी लाट टाळता येईल अशी मागणी अमोल वेटम यांनी केली आहे
0 Comments