!! अत्त दिप !!


अज्ञानाच्या गावा,
ज्ञानाचा दिवा लावा
प्रकाशमान व्हावा,
आसमंत.

दिवाळीच्या दिसी,
पणत्यांची राशी,
लावा समाधीपाशी
महापुरुषांच्या.

ज्योती ने ज्योत जळे,
अवघे तिमीर उजळे,
चर आचर सगळे,
प्रज्वलित.

काल्पनिक देवी देवता,
नाहक भाकड कथा,
अविवेकी जिर्ण प्रथा,
गुलामीच्या.

पंच शिल अंगाची,
सफाई सर्वांगाची,
रांगोळी अष्टांगाची,
दारी सदा.

प्रज्ञे च्या तेलात,
करुणेचे दिप जळे,
अत्त दिप प्रजळे,
आयुष्यात.

-चित्तरंजन चौरे. 
कुशीनगर, नागपुर 
9422906264