प्रज्ञा

प्रज्ञा म्हणजे ज्ञानी होणे, अंतदृष्टी प्राप्त होणे, ज्ञान पुर्ण होणे.

जेव्हा ज्ञान पुर्ण होते. निर्वाणीचा साक्षात्कार होतो. म्हणजे निर्वाणाच्या जवळ जातो. हळूहळू लौकिक ज्ञानापासून पारलौकिक ज्ञानापर्यंत धम्माच्या सुक्ष्म अति सुक्ष्म ज्ञानापर्यंत जाणे.

प्रज्ञा किती प्रकाराच्या आहेत. तर प्रज्ञा तीन प्रकारच्या आहेत.

1) सुत्तमय प्रज्ञा

2) चिंतनमय प्रज्ञा

3)भावनामय प्रज्ञा

1) सुत्तमय प्रज्ञा म्हणजे ऐकलेले ज्ञान, वाचलेले ज्ञान, बघितलेले ज्ञान. यातून माहीत ज्ञान. ज्या ज्या मार्गाने आपल्या जवळ ही संपुर्ण माहिती व ज्ञान येते त्या माहितीपासून आलेल्या ज्ञानाला सुत्तमय प्रज्ञा म्हणतात.

2) चिंतनमय प्रज्ञा म्हणजे असलेल्या ज्ञानावर तर्क लावणे. संपुर्ण प्राप्त माहितीवर आपण चिंतन करून त्यावर आपण तर्क लावून नवीन माहिती मिळवणे, समजणे, चिंतन करणे, तर्कवितर्क लावणे यालाच चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. ज्या ज्या उपलब्ध मार्गाने म्हणजेच पुस्तकातून, ऐकण्यातून, चर्चेतून, बघण्यातून. हि संपूर्ण माहिती एकत्रित करून या प्राप्त माहितीतून आपला वेगळा विचार मांडणे किंवा निर्माण करणे म्हणजे चिंतनमय प्रज्ञा होय. सर्वजण चिंतनमय प्रज्ञा पर्यत पोहोचू शकतात. पण पुढच्या प्रज्ञापर्यंत फक्त ज्ञानी आणि विद्वानच जाऊ शकतात.

3) भावनामय प्रज्ञा म्हणजे भावित होणे, उत्पन्नित होणे, महत्त्वाचे म्हणजे जे ज्ञान अनुभवाने प्राप्त झाले आहे. हे अवश्यक नाही की, हे ऐकलेले ज्ञान किंवा चिंतनातून उत्पन्न झालेल्या ज्ञाना सारखेच असेल.

हे ज्ञान अनुभवाने प्राप्त ज्ञान आहे. जसे भावित झाले आहे तसे. हे अनुभवाने अंतर्दृष्टिने प्राप्त ज्ञान आहे. हिच ती भावनामय प्रज्ञा आहे. जी आपल्याला निर्वाणपर्यंत घेवून जाते. हि मुक्तीच्या मार्गाकडे नेते. अनित्य, अनात्मा, दु:खाला समजणे म्हणजे प्रज्ञा.

अनित्य म्हणजे वस्तूंच्या भंगुरतेचे ज्ञान होणे. दुःख म्हणजे दुःखाचे संपूर्ण क्षेत्र जाणणे.

अनत्म म्हणजे जिथे जिथे मोह, आसक्ती, तृष्णा आहे. जिव्हाळा आहे. जिथे जिथे आत्मियता आहे. त्या पोकळीला जाणणे त्याच्या निरोध संबंधित जाणणे.

प्रज्ञा श्रद्धेला अंधश्रद्धा बनण्यासाठी रोखून ठेवतो थांबून ठेवतो. प्रज्ञा श्रध्देला अंधश्रद्धा बनु देत नाही.

प्रज्ञा विवेकला जागृत ठेवण्याचे काम करते. प्रज्ञा हि श्रध्देचा अतिरेक होवू देत नाही. आपल्याला अतिरेकापासुन वाचवते. जास्त तर्कवितर्क पासून वाचवते. आपण फक आपल्या अनुभवावर जोर दिला पाहिजे. आपल्या अनुभवावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

स्वतःच्या विचाराने, अनुभवाने भावित किंवा उत्पन्न झालेले ज्ञान म्हणजे भावनामय प्रज्ञा होय.

याच संपूर्ण ज्ञानालाच प्रज्ञा किंवा प्रज्ञापारमिता म्हणतात.

- अजय पवार 

जळगाव, 7620111313