मागासवर्गीय निधी अपहार प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महासंचालक धम्म ज्योती गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या गुन्हा दाखल करावा

अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटच्या तरतुदी करिता आंबेडकरी संघटना आक्रमक

अनुसूचित जाती-जमाती करिता लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटची तरतूद करा : अमोल वेटम
विविध मागण्याबाबत ०८ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन दुसरा दिवस

मुंबई दि.०९ : मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्यावर अनुसूचित जातीचा निधीचा अपहार करणे, पैसे वळविणे, भ्रष्टाचार आदी बाबत गुन्हा दाखल करावा. निती आयोग यांच्या मार्गदर्शक धोरणानुसार अनुसूचित जाती, जमाती यांच्या लोकसंख्येनुसार राज्यातील चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात  स्वतंत्र बजेट मंजूर करावे, अनुसूचित जाती करिता ७० हजार कोटी, तर अनुसूचित जमाती करिता ३५ हजार कोटी रुपये मंजूर करावे, कर्नाटक राज्याने अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र न वळविण्याबाबत जो कायदा पारित केलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील असाच कायदा पारित करावा. उपवाटप, संसाधने, नियोजन आणि घटक योजनेचा आराखडा तयार करावा. टार्गेटेड स्कीम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलती करिता भरगोस निधीची तरतूद करावी.

महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, फ्रीशिप इतर योजनामध्ये वाढ करण्यात यावी, शिष्यवृत्ती करिता उत्पन्न मर्यादा ही २.५ लाखावरून ८ लाख करण्यात यावी, बार्टी मार्फत भीमा कोरेगाव इव्हेंट प्रकरणी बील मंजुरीसाठी पार्टी घेणे तसेच जातीचे प्रमाणपत्र, व्हॅलेडीटी यामधील होणारा भ्रष्टाचारबाबत कायदेशीर कारवाई व्हावी, सामाजिक न्याय विभागाचा अखर्चित निधी मार्च अखेर खर्च करण्यात यावा. पीजी कोर्सेसकरिता फ्रीशिप सवलतीमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमाचा समाविष्ट करावा. मागासवर्गीय बेरोजगार व्यक्तीला शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार बिनव्याजी अर्थसहाय्य करावे.

राज्यातील बार्टी समता दूत, प्रकल्प संचालक, नोडल ऑफिसर आधी तात्काळ बरखास्त करावे व स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली ३० प्रशिक्षण संस्थाना विना निविदा कोट्यावधी रुपये देणे या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, शासकीय तंत्रनिकेतन तासगाव येथील सीएचबी भरती मध्ये गैरकारभाराबाबत गुन्हा दाखल करावा, डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना अंतर्गत अजूनही निधी देण्यात आलेला नाही, भिमा कोरेगाव करिता बार्टीचे १०० कोटी तर ८७५ कोटी कामठी येथील हॉस्पिटल करिता वळविण्यात आले आहे हा निर्णय मागे घ्यावा, सामाजिक न्याय विभागाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे. संजय गांधी निराधार योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, रमाई घरकुल योजना मधील जाचक अटी रद्द करा.

दि. ०८ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, जनसंघर्ष क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संतोष आठवले, अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष दादासाहेब यादव, भिमयान फौंडेशन प्रमुख अमित वाघवेकर, विलास जाधव, ॲड सागर पवार, शाहीर शंतनू, निकिता कांबळे, ॲड रेवत थोरात, जीवन भालेराव  आदी उपस्थित होते.