अशोक कांबळे राज्यस्तरीय "गुणवंत शिक्षक रत्न" पुरस्काराने सन्मानित
अशोक कांबळे राज्यस्तरीय "गुणवंत शिक्षक रत्न" पुरस्काराने सन्मानित
कोल्हापुर प्रतिनिधी /साप्ताहिक भीमयान:
स्वा.वि.दा सावरकर माध्य विद्यालय मिणचे बुद्रुक ता.भुदरगड चे सहाय्यक शिक्षक, आणि साप्ताहिक भीमयानचे उपसंपादक- अशोक कांबळे (रा. हसुर बुद्रुक ) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्यातर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न-२०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
२०२०/२१ या शैक्षणिक वर्षात त्यांनी केलेल्या शैक्षणिक, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
शाळेचे अनेक विद्यार्थी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरीय पात्र ठरले आहेत. तर श्रेयस पाटील हा विद्यार्थी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आला होता. ईनस्पार्यड अवॉर्ड साठी काही विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय मानांकन मिळाले होते. मेंदूशी मैत्री, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम, ऑनलाईन कार्यशाळा, यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता.
"साप्ताहिक भीमयान" च्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, यावर आवाज उठवून अतिशय मोलाचे कार्य केले आहे.
त्याचबरोबर चाळीस वर्षांपासून रखडलेला बोळावी-हसुर बुद्रुक रस्ता, चिकोत्रा खोऱ्यातील रस्ते, पाणी, व सामाजिक विषयावर त्यांनी पत्रकारिते च्या माध्यमातून संघर्ष केला आहे. या सर्वांची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने सन २०२०/२१ मधील विवीध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गुणिजन शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
भारतीय बौद्ध महासभा-संस्कार विभागाचे कागल तालुका- अध्यक्ष, भुदरगड तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे सदष्य म्हणून ते कार्यरत आहेत.
मूरगुड येथील चळवळीतील सक्रिय कार्येकर्त संजय प्रधान यांचे वयाच्या ३७ व्या वर्षी अकाली दुःखद निधन झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलावर आभाळ कोसळले होते. केवळ सहानुभूती व्यक्त न करता अशोक कांबळे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या १० वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
0 Comments