हसूर बुद्रुक येथे गणेश मंडळातर्फे

 विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

मंडळातर्फे झाला पत्रकांराचा गौरव


   कागल / भीमयान प्रतिनिधी


      हसुर बुद्रुक ,(ता.कागल) येथील श्री. गणेश मंडळ यांच्यातर्फे गणेशोत्सवा निमित्य विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. 

नितेश महाराव रायरकर यांचे आयुष्यावर बोलू काही यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर खास महिलांच्यासाठी होमामिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती.

          या कार्यक्रमाचे उदघाटन मुरगूड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते झाले.

            यावेळी दै. तरुण भारतचे पत्रकार- सदाशिव आंबोशे, दै. पुण्यनगरीचे पत्रकार- अवधूत आठवले, दै.महासत्ताचे पत्रकार- विष्णुपंत इंगवले, सप्ताहिक भीमायानचे उपसंपादक - अशोक कांबळे यांचा उत्कृष्ट पत्रकारिते बद्धल सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

          पोलीस स्वप्नील मोरे, श्री. देसाई, राहुल देसाई. उपस्थित होते.

          स्वागत व प्रस्ताविक हसूर बुद्रुक चे  उपसरपंच व श्री.गणेश मंडळाचे अध्यक्ष- पुरुषोत्तम साळोखे यानि केले.

           यावेळीं घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल असा.

सौ. रेखा साचीन् येलकर (पैठणी साडी)

सौ.लताताई नामदेव भोसले.(मिक्सर)

सौ.पूनम मागदुम.(वाटर फिल्टर)

                स्पर्धेचे सूत्रसंचालन सिने अभिनेते- मदन पलंगे यांनी केले. त्याचबरोबर स्पर्धत सहभागी महिलांचा आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान केला.

   कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.