कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांसह 
विविध समस्यांबाबत कागल रिपाइं तर्फे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कागल /भीमयान प्रतिनिधी

          कागल तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दाखले देण्यास टाळाटाळ होत असले बाबत व इतर समस्यांबाबत कागल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. संसारे साहेब यांना रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.

        शासनाकडून अटल घरकुल व इतर घरकुल योजनेचा कामी संबंधित गावचे ग्रामसेवक यांच्याकडून यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसलेचा दाखला बंधकनकारक  असताना काही ग्रामसेवक दाखले देण्यास टाळाटाळ करतात, नकार देतात. यामुळे लाभास पात्र बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहत असून बांधकाम कामगारांवर अन्याय होत आहे.  याकरिता गट विकास अधिकारी कागल यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना लेखी सूचना करून दाखले देण्याबाबत आदेश देण्यात यावा यां करिता कागलचे गटविकास अधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात आले. 

         कागल तालुक्यातील दलित वस्ती सुधारणा निधी व 15% निधी खर्च करताना काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यामध्ये कसूर करणारी ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कागल तालुक्यातील काही गावात दलित समाजासाठी आजही स्वतंत्र स्मशासनशेड बांधलेले नाहीत.  मृत व्यक्तीस आजही उघडयावर अंतिम संस्कार करावे लागते. काही गावात आजही मागासवर्गीय मृत व्यक्तीस मुख्य स्मशानभूतीत अंतिम संस्कार करण्यास विरोध मज्जाव केला जातो, याच मानसिकतेतून  बेनिक्रे गावातील रवी कांबळेच्या अंतिम संस्कार बाबतीत घडलेला अनुचित प्रकार कागल तालुक्यातील पुरोगामित्वाचा बुरखा फाडणारा प्रकार घडला. यामुळे कागल तालुक्यात आजही बऱ्याच गावातील दलित मागासवर्गीय समाजासाठी स्मशानशेड नाहीत तिथे तात्काळ स्मशानशेड बांधकाम करावे अशी मागणी आज निवेदनाद्वारे देण्यात आली. निवेदनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी अन्यथा रिपाइं तर्फे उग्र आंदोलन छेडणेत येईल असा इशारा देणेत आला.

      यावेळी निवेदन देताना रिपाइं कागल तालुका नेते (क्रियाशील पक्ष सदस्य ) रमेश कांबळे (RB),  रिपाई कागल युवा नेते सचिन कांबळे सिध्दनेर्लीकर,  बाळासो भारमा कांबळे मुरगुडकर, प्रदीप कांबळे बच्चन,राहुल कांबळे गलगलेकर,   कृष्णात धनाजी पाटील( ऑल इंडिया पोलीस जन सेवा संघटना) यासह कार्यकर्ते उपस्थित होते.