महाविर किडक पर्यावरण प्रेमी पुरस्काराने सन्मानित
महाविर किडक पर्यावरण प्रेमी पुरस्काराने सन्मानित
अशोक कांबळे/भीमयान प्रतिनिधी-
ओसाड माळावर मित्र परिवार आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने वृक्षारोपण करून नंदनवन फुलवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल हसुर बुद्रुक ता. कागल ग्रामपंचायतीने महाविर किडक ( हसुर बुद्रुक) यांना ' पर्यावरण प्रेमी ' पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
हसुर बुद्रुक येथील लक्ष्मी मंदिर पासून हसुर खुर्द पर्यंतचा दीड किलोमीटर रस्त्याचा बाजूने असलेला उत्तरेकडील डोंगर ओसाड आणि उजाड दिसत होता. या डोंगरावर नंदनवन फुलवण्यासाठी दोन्ही गावातील तरूणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निश्चय केला.
सुरवातीला हसुर बुद्रुक आणि हसुर खुर्द येथील सुशिक्षित आणि पर्यावरण प्रेमी तरुणांनी एकत्र येत जाणीव फौंडेशन ची स्थापना केली.
हजारो मदतीचे हात पुढे आले आणि दोन तीन हजार वृक्षांची लागवडच न्हवे तर त्याचे जतन करण्यासाठी नियोजन करण्यात आले. आणि अखेर या ओसाड उजाड डोंगराचे रूपांतर हिरवाईने नटलेल्या डोंगरात झाले.
यासाठी मुंबईत वास्तव्यास असूनही पर्यावरण प्रेमातून महाविर किडक व ऑक्सिजन पार्क टीम यांचा पुढाकार, संकल्पना, आणि सहृदयीं विचारातून ऑक्सिजन पार्क साकरल्याबद्धल ग्रामपंचायत हसुर बुद्रुक चे सरपंच दिग्विजय पाटील, उपसरपंच पुरूषोत्तम साळोखे, ग्रामसेवक गोविंद पोवार, व सर्वं सदस्यांच्या हस्ते महाविर किडक यांचा पर्यावरण प्रेमी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
0 Comments