साप्ताहिक भीमयान तर्फे तानाजी भोसले यांना "राज्यस्तरीय समाजरत्न " पुरस्कार जाहीर..!
साप्ताहिक भीमयान तर्फे तानाजी भोसले यांना
"राज्यस्तरीय समाजरत्न " पुरस्कार जाहीर..!
अशोक कांबळे / हसुर बुद्रुक -
आपल्या हृदयाची झालेली अँजिओप्लास्टी सारखी शस्त्रक्रिया....! पायाच्या अपघातामुळे पायात बसवलेला दीड किलोचा स्टीलचा रॉड...! स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी कर्ज काढून घेतलेला भेळ आणि वडापावचा गाडा....!
आणि त्या कमाईतून मुलांचे शिक्षण व कुटूंबाची जबादारी सांभाळत... चळवळीत स्वतःला पुर्णपणे झोकून देत... कार्य करणारे तानाजी शिवाजी भोसले राहनार- नदीकिनारा- सिद्धनेर्ली. ( ता. कागल ) यांना महाराष्ट्रातील अग्रगण्य, निर्भीड आणि अन्याय विरोधात लढणाऱ्या " साप्ताहिक भीमयान"...! या वृत्तपत्रातफे तर्फे दिला जाणारा सन- 2022 चा " राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार" घोषित झाला आहे.
कागल तालुक्यात चळवळीत कार्य करणाऱ्याची संख्या अलीकडे रोडावत असताना दुसरिकडे मोजक्या शिलेदारांना घेऊन तानाजी भोसले हे तानाजी मालुसरे प्रमाणे आपलया रांगडया व्यक्तिमत्त्त्वांच्या बळावर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे " संपुर्ण भारत बौद्धमय करीन" हे स्वप्न उराशी बाळगत.... धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी शर्थींने खिंड लढवत आहेत.
नोकरी,व्यवसाय किंवा शेती करणारे... सुशिक्षित आणि सदन मध्यमवर्गीय लोक.... आज चळवळीकडे काना डोळा करत असताना..? तानाजी भोसले सारख्या व्यक्तीने चळवळीसाठी केलेली पदरमोड...! सोसलेली आर्थिक झळ.. !
आणि चळवळीसाठी दिलेले बळ आणि स्वतःचा वेळ...! हे कुशल कर्म निश्चितच प्रेरणादायी, आदशर्वत, आणि अभिमानास्पद आहे, असे म्हणावे लागेल.
भारतीय बौद्ध महासभा कागल तालुका अध्यक्ष म्हणून तानाजी भोसले कागल तालुक्यात धम्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत असतानाच सोबत पत्नी वैशाली तानाजी भोसले यांच्याकडे केंद्रीय शिक्षिका पद देऊन त्यांच्याकडे महिलाना संघटित करण्याची जबाबदारी सोपविली आहे ही बाब वंदनीय आहे.
समता सैनिक दलाचे निष्ठावंत सैनिक म्हणून शिबीर आयोजित करणे, बाल संस्कार शिबिर, वधुवर सूचक मेळावा, महिला व पुरुषांसाठी श्रामनेर-बौद्धचार्य शिबिर, वर्षावास, बुद्ध पौर्णिमा, शिव, शाहूं, फुले, आंबेडकर, रमाई, सावित्रीबाई, जिजाऊ जयंती, पुण्यतिथी, धम्म पर्यटन, गरीब वंचित विध्यार्थी मदत, कोरोणा च्या काळात दिलेली मदत, महापुरात नुकसान झालेल्याना दिलेली मदत.. !
या सर्व रचनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेत " साप्ताहिक भीमयान पुरस्कार वितरण समिती " ने तानाजी शिवाजी भोसले यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार दि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कागल तालुक्यातील केंबळी येथे वर्षा वास सांगता समारंभ संपन्न होत आहे. या कार्यक्रमात साप्ताहिक भीमयानचे संपादक- अभिजित वाघवेंकर यांच्या हस्ते व उपसंपादक - अमित वाघवेंकर व अशोक कांबळे, व्यवस्थापक- नितिन कांबळे सहा. व्यवस्थापक- प्रविण शिंदें यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
0 Comments