जीवन शिक्षण विद्यामंदीर रौप्य महोत्सव वर्षे जल्लोषात साजरे होणार
जीवन शिक्षण विद्यामंदीर रौप्य महोत्सव वर्षे
जल्लोषात साजरे होणार
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
दानोळी/प्रतिनिधी :
आदर्शगाव (धरणग्रस्त वसाहत) दानोळी या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरे होणार आहे. याकरिता जय्यत तयारी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननिय ना. दिपकजी केसरकर यांच्या प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे.
तसेच या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे खासदार मा. श्री. धैर्यशील माने, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर, दत्त साखर शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आजी माजी जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत दानोळीचे माजी व विद्यमान सरपंच व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा होणार आहे.
जीवन शिक्षण विद्यामंदीर ची 22/12/1997 साली स्थापन करण्यात आली. या स्थापनेच्यावेळी केवळ एकशिक्षक या शाळेमध्ये शिकविण्यास होते. पुढे चौथी पर्यंत वर्ग वाढले. त्यानंतर आत्ता 7 पर्यंत शाळा सुरू आहे. आत्तपर्यंत शाळेचा प्रवास अतिशय अप्रतिम आहे. शाळेचे विद्यार्थी विविध विभागांमध्ये राज्य पातळीपर्यंत आपले प्राविण्य मिळवत आहेत. शाळेचा विकास उच्च पातळीवर करण्यामध्ये सर्व शिक्षक वृंद शिक्षण समिती, ग्रामसमिती, सर्व ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन आदर्शगाव ग्राम समिती अध्यक्ष रफिक पटेल, शालेय व्यवस्थापन समिती भीमराव तांबे तसेच ग्राम विकास कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ पाटील यांनी आवाहन केले आहे.
0 Comments