आंबेडकरवादी जनतेचे आंदोलन भाजप सरकारला. निर्धार मोर्चाचा आक्रोश
आंबेडकरवादी जनतेचे आंदोलन भाजप सरकारला. निर्धार मोर्चाचा आक्रोश
न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान सहन केल्या जाणार नाही. सतर्कतेचा इशारा
अंबाझरी :
अंबाझरी स्थित 20 एकर जागेवरील डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन बेकायदेशीर उध्वस्त केल्याच्याआंबा विरोधात विभागीय धरणे हिवरीनगर येथे तीन दिवस घेण्यात आले. संविधान जागर लघु नाट्य सादर करण्यात आली. धरणे आंदोलनाची सांगता निर्धार मोर्चेने करून त्याचे डॉ आंबेडकर चौक येथे जाहीर सभेत समारोप करण्यात आला. स्मारकाची वीस एकर जागा स्मारकासाहित घेतल्याशिवाय राहणार नाही, व बेकायदेशीर रित्या बुलडोझर ने भवन पाडणाऱ्याना अटक झालीच पाहिजे हा निर्धार या आंदोलनात करण्यात आला व भव्य निर्धार मोर्चा काढण्यात आला. कोर्टाचा निर्णय येऊन 12 दिवस झाले असूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही यासाठी शासन प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयाला दुर्लक्षित करणे हा कोर्टाचा अपमान होय यावर संपूर्ण आंदोलनकर्त्यांचा तीव्र रोष होता. या प्रकरणात नागपूरचे पालकमंत्री व पोलीस कमिशनर यांनी स्वतः लक्ष केंद्रित करावे ही मागणी आंदोलनकर्त्यांची राहिली.
जाहीर सभेला प्रमुख वक्ते म्हणून ऍड रमेश शंभरकर, प्रा नूतन माळवी, प्रा रमेश पिसे उपस्थित होते. ऍड रमेश शंभरकर यांनी देशातील शासनकर्त्यांचा यथोचित समाचार घेतला. सभेचे संचालन उज्वला गणवीर यांनी, अध्यक्षस्थान मा किशोर गजभिये यांनी केले. प्रास्ताविक राहुल परुळकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ अशोक उरकुडे यांनी केले. सभेला डॉ धनराज डहाट, तक्षशीला वागधरे, डॉ सरोज डांगे, छाया खोब्रागडे, उषा बौद्ध , दादा हटवार यांची विशेष उपस्थिती होती. धरणे आंदोलनाच्या यशस्वीते साठी रंजना वासे, ज्योती तिरपुडे, दिलीप रामटेके, सत्यवान मेश्राम, विजय मेश्राम, इंदूताई सोमकुवर, व समस्त पूर्व नागपूर मधील प्रबुद्ध जनतेने परिश्रम घेतले.
0 Comments