दलित मागासवर्गीय पुरग्रस्तांना कायमस्वरूपी राहण्यासाठी 

भूखंड मिळावा अन्यथा बेमुदत आमरण उपोषण 


पूरग्रस्त निवारस समितीचे अध्यक्ष दिगंबर सकट यांचा इशारा

उमळवाड/प्रतिनिधी :

उमळवाड (ता.शिरोळ) येथील दलित मागासवर्गीय समाजाची नदीपात्रास जोडलेल्या ओढ्यालगत घरे आहेत. दरवर्षी या ओढ्यास पाणी येऊन पुराचा धोका उद्भवतो. मागासवर्गीय समाजातील कायमस्वरूपी प्रश्‍न निकाली काढावा अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पूरग्रस्त निवारण समितीचे अध्यक्ष दिगंबर सकट यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुणे आयुक्त यांनी या गोष्टीचा विचार करून जैनापूर (ता.शिरोळ) येथे उमळवाड गावाच्या वेशीच्या जवळ राहण्याकरिता सांगितले असून त्यानुसार पूरग्रस्त राहण्यासाठी गेले असता जैनापूर ग्रामस्थांनी जोपर्यंत शासन आदेश मिळत नाही तोपर्यंत राहू देणार नाही असा वाद चालू झाला आहे. जोपर्यंत पूरग्रस्तांचा निर्णय मार्गी लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पूरग्रस्त निवारण समितीचे अध्यक्ष दिगंबर सकट यांनी दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॊग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे यांच्या सह्या आहेत.