वीज महावितरण कंपनीने चालवलेले अन्यायकारक 



वीज तोडणी मोहिम त्वरित थांबवा  : आरपीआयची मागणी

कागल/प्रतिनिधी :

कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण मानव जात भयभीत झाली आहे, त्यातच राज्य शासनाने गेली दोन वर्षे कडक लोक डाऊन करून महाराष्ट्रात कडक निर्बंध केले आहेत. त्यामुळे जगायची की मरायचे हा प्रश्‍न सर्वसामान्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. हे संपूर्ण मानवजात नष्ट होते की काय? अशी परिस्थिती असताना कोरोनाने सर्वसामान्यांचे व्यवसाय बुडवले. हाताला काम नाही, रोजगार नाही, शेतीचे काम बंद असताना लोक डाउन मुळे सगळेच घरात बसून आहेत, अशातच महावितरण कंपनीने चालवलेली वीज तोडणी अन्यायकारक आहे ती त्वरित थांबवा, असे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते सतीश माळगे यांनी रुकडी येथील महावितरण कंपनीचे शाखेचे अभियंता सांगलीकर यांच्याकडे मागणी केली आहे.

रुकडी येथील 80 वीज कनेक्शन महावितरण कडून तोडण्यात आली होती.  यासंदर्भात हातकणंगलेचे अभियंता महिलापुरे यांच्याशी  संपर्क साधत रुकडी येथील ती तोडलेली सर्वच 80 वीज कनेक्शन पुन्हा पूर्ववत जोडण्यास सतीश माळगे यांनी भाग पाडले. तसेच वीज कनेक्शन पुन्हा तोडू नका अन्यथा रिपब्लिकन पक्ष महावितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी समज रुकडी शाखेचे शाखा अभियंता सांगलीकर यांना देण्यात आली. यावेळी प्रदीप ढाले, संबोधी कांबळे, अमित शिंदे, सुहास हुपरीकर, सुमित कांबळे, विशाल गायकवाड, अभिजीत कांबळे, स्वप्निल कांबळे, वैभव गायकवाड यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.