दलित युथ पँथर वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांना निवेदन

लातूर :- 

चाकुर तालुक्यातील चापोली येथील बी.एस.एफ केंद्र चाकुर करिता संपादित केलेल्या 2005 साली गायरान जमिनीचा इतरांप्रमाणे मोहाजा मिळावा. इतर गायरान धारका प्रमाणे मोहाजा बी.एस.एफ केंद्र चालु होऊन 15 वर्ष होत आहेत. तरी शासन मौजे चापोली ता‌. चाकुर येथील गट क्रमांक 693, मधील जमीनीचा 4 हे. 59 आर, मोहाजा देण्याचा साधा विचार करत नाही. कृपया महोदय आम्हाला भीक नको आमच्या हक्काचा इतर नागरिकांप्रमाणे त्वरीत न्याय द्यावा. अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशिल सरकाळे यांनी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी देविदास भालेराव, आकाश कांबळे, अविनाश कांबळे आदि उपस्थित होते.