मौजे जाफर वाडी येथील नागरिकांचा पाणी प्रश्‍न अखेर सुटणार 

खुलताबाद/प्रतिनिधी : 

ग्रुप ग्रामपंचायत खांडी पिंपळगाव जाफर वाडी येथे 15 वित्त आयोगातून पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असुन लवकरच नागरिकांचा पाणीप्रश्‍न सुटणार असल्याचे सरपंच सज्जनसिंग नवलसिंग झाला यांनी सांगितले. तर यावेळी रिपाई तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव, माजी सरपंच दामोदर महालकर, सोसायटी संचालक अशोक महालकर, सोसायटी संचालक बबन भालेराव, चरणसिंग राठोड उपस्थित होते.