मानवता जिवंत असेपर्यंत.....!!
मानवता जिवंत असेपर्यंत.....!!
विकता आले असते आभाळाला
तर ते ही विकले असते
कदाचित
इथल्या सत्ताधारी गिधाडांनी
जसे मातृभूमीचे अलंकार
विकले जाता येत दिवसेंदिवस.....
रखवालदाराचा आव आणून
देशभक्तीचे गुणगाण गात
कुंपणानेच शेत खावं
अगदी चाटून पुसून
अन् बांधानी मुग गिळून पाहत राहावं
षडाची भूमिका घेत
आपापसात धर्माच्या गुंगीत बेधुंद होत
अखेर कधीपर्यंत.....
उजाडलेल्या भूमीवर पारतंत्र्याचा
अंधार पसरू पाहणाऱ्या पंखांनी
भानावर यावं
सम्यक विचारांनी पेटलेल्या पाखरांनी
क्रांतीच्या मशाली हातात घेऊन
खोट्या बनावाचे बुरखे टराटरा फाटन्याअगोदर.....
सत्याला गाडून
मानवतेच्या छाताडावर उभ राहुन
खोट्याचा मनोरा बांधता येत नाही कधीच
असत्याचे मजले कोसळतात आपोआप
काही काळानंतर......
दगडांचे विद्रुपीकरण करून
सत्य कधीच लपवता येत नाही
या माय भूमीत कुठेही खोदले तरीही
शांतीचा मार्गदाता तथागत गौतम बुद्ध च सापडतो.....
कत्तली करून विचार
संपवता येत नाही कधीच
माणूस मेला जातो
मात्र विचार जिवंत राहतात
अगदी सूर्य चंद्र असेपर्यंत......
धर्माचा झेंडा घेऊन मानवतेचा गळा
घोटणाऱ्या फकीर ने विसरू नये कधीच
ही मायभूमी योध्याची क्रांतिभूमी च
राहणार इथल्या माणसांमधली
मानवता जिवंत असेपर्यंत
मानवता जिवंत असेपर्यंत.....!!
आयु. एस टी धम्म दीक्षित
काळामवाडी कोल्हापूर
९६११२५३४४१.

0 Comments