मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती, खानावळ, व इतर भत्ता तात्काळ देण्याची सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे मागणी
ऑल इंडिया पँथर सेना अर्धापूर यांचे निवेदन
नांदेड :
सध्या कोरोणाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. सर्व कामधंदे ठप्प झाले आहेत. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या वर्षापासून महाराष्ट्रा मध्ये ओला दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकरी बांधवही खूप मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पालकांना प्रश्न पडला आपल्या मुलांना शिक्षण द्यावे कि त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अन्न. अशा मनस्थितीत हा महाराष्ट्र उभा आहे. खेडेगावातील परिस्थिती अतिशय हालाखीची झालेली आहे. समाज कल्याण खात्याच्या वस्तीगृहा मध्ये बहुजनांची मुली शिकत आहेत परंतु कोरोणाचे संकट असल्यामुळे वस्तीगृह covid-19 साठी ताब्यात घेण्यात आले आणि वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले वस्तीगृह जर चालू असते तर विद्यार्थ्यांना खर्च करावा लागला असता समाजकल्याण खात्यातील विद्यार्थ्यांचा हक्काचा निधी त्यांना तात्काळ मिळावा. समाज कल्याण खात्यातुन संपूर्ण महाराष्ट्र मधून 105 कोटी चा निधी न खर्च करता शासनाला परत केला आहे म्हणून निधी उपलब्ध नाही हा विषयच राहत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिष्यवृत्तीचे प्रश्न प्रलंबित आहेत म्हणून विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती वाटप करून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना खानावळ खर्चासह इतर खर्च द्या देण्यात यावा, याप्रकरणी सामाजिक न्याय मंत्री (म. रा.)यांना मा. तहसीलदार साहेब अर्धापूर यांच्या मार्फत ऑल इंडिया पँथर सेना अर्धापूर च्या वतीने देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश सावते, तालुकाध्यक्ष आनंदराव सीनगारे,राजाराम सरोदे,देवा कांबळे, गणेश कांबळे, महेंद्र सरोदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments